वर्धा : जिल्ह्याचा विकली पॉझिटिव्हिटी दर घटल्याने कठोर निर्बंधात मोठी शिथिलता देत व्यावसाविक प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याच अनलॉकच्या पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. गर्दीच्या ठिकाणी आलेल्या बहुतांश व्यक्तींच्या तोंडावर मास्क असले तरी सोल इिस्टन्सिंगच्या नियमाला पाठच दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
नवीन कोविड बाधित सापडण्याची संख्या रोडावल्याने तसेच विकली पॉडिटिव्हिटी दरात मोठी घसरण आल्याने जिल्ह्यातील कठोर निर्बंधात शिथिलता देत अत्यावश्यक सेवांची तसेच अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर व्यावसाविक प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे.
ही परवानगी देताना कोविड संदर्भातील खबरदारीच्या उपाय योजनांचे काटेकोर पालन करून व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे; पण सोमवारी अनलॉकच्या पहिल्या दिवशी साध्या कामासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे मोबाइल दुरुस्ती व विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची सर्वाधिक गर्दी असल्याचे बघावयास मिळाले.