वर्धा : वीणा गोपाळकृष्ण राऊत (६६, रा. नागपूर रोड, वर्धा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या आधारवडचे कार्याध्यक्ष व बचत गट नालवाडीचे अध्यक्ष गोपाळकृष्ण उपाख्य बाबासाहेब राऊत यांच्या पत्नी होत. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात आले.