
मिनाक्षी रामटेके
वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावीत. वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू माहे. एप्रिल २०२१ पासून युरिया वगळता इतर रासायनिक खतांची भाववाढ खत उत्पादक कंपन्यानी केली होती. केंद्र शासनाच्या २० मे, २०२१ च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी केंद्र शासनाने अनुदान देण्याचे घोषित केले आहे.
त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्या दरानेच विकणे आहेत. तरी काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापिल किंमतीनुसार खते विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. ज्या खत विक्रत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे, त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी.’’
शेतकर्यांनी देखील जुन्या खताचा साठा हा जुन्याच दराने खरेदी करावा तसेच नविन खते २० मे २०२१ च्या आदेशान्वये सुधारीत दराने खरेदी करावी. खत विक्रेत्यांकडून जुना साठा नविन दराने विक्री होत असल्याचे किंवा खताच्या बॅगच्या दराबाबत बॅगवर खाडाखोड केल्याचे आढळून आल्यास कारवाई संदर्भात संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेशी संपर्क साधुन तक्रार करावी. किंवा जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार वर्धा, अनिल इंगळे मोबाईल क्रं. ९ ४०५२१ ९ ४७८, कृषि विकास अधिकारी जि.प. वर्धा अभयकुमार चव्हाण, मोबाईल क्रं. ८३६ ९ ७३५१५ ९ मोहीम अधिकारी, कृषि विकास अधिकारी, जि.प. वर्धा श्री संजय बमनोटे मोबाईल क्रमांक ९४२२८४२२४५ व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वर्धा, पि.ए.घायतिडक, मोबाईल क्रमांक ७५१७३६६९३३ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा यांनी केले आहे.