सायली आदमने
पवनार : येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात 45 वर्षा वरील सर्व नागरिकांकरीता लसीकरण शिबीर सुरु करण्यात आलेले आहे. कोशील्ड लस या ठिकाणी नागरीकांना देण्यात येणार आहे. कोरोना माहामारीवर लस हाच ऐकमेव पर्याय आहे त्यामुळे गावातील जास्तीत जास्त नागरीकांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन सरपंच शालिनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर यांनी ग्रामस्थांना केले आहे.
अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र नसल्याने नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी जात लसीकरण करावे लागत आहे मात्र पवनार ग्रामपंचायत प्रशासनाने गावातच लसीकरणाची सोय ग्रामस्थांना करुन दिली तरी नागरीकांनी सकाळी ९ वाजता पासून लसीकरणाकरीता आधार कार्ड सोबत घेवून येत लसीकरण करावे.
ज्या नागरीरीकांचे लसीकरण व्हायचे आहे अशा नागरीकांनी लसीकरणास यावे ज्यांचे लसीकरण झालेल आहे अशांनी आपल्या वॉर्डातील 45 वर्षावरील नागरिकांना माहिती देऊन त्याना लस घेण्यास प्रवृत्त करावे सामाजीक कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेत जनजागृती करावी असे आवाहन पवनार ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.