वर्धा : महाज्योतीला विद्यार्थ्यासाठी योजना आखून त्या राबविण्यात अपयश आल्याने निधी अखर्चित राहिला सव्वाशे कोटी रुपये परत गेले, यासाठी जवाबदारी असणारे व्यस्थापक व त्या संबंधीचे अधिकारी यांची हकालपट्टी करण्यात यावी. या योजनेसाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष तुषार पेंढारकर यांची निवेदनातून केली आहे.
महाज्योति प्रशिक्षण संस्थेतील नियमाप्रमाणे १६ अधिकारी व काही कर्मचारी असे पदे मंजूर आहेत. पण ते कार्यरत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. व्यवस्थापकीय संचालक हे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळे संपूर्ण जिल्ह्यावर दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडे इतर चार्ज असल्यामुळे या वर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महाज्योति कडे दुर्लक्ष होत आहे. दैनंदिन कामाकडे लक्ष नसल्याने महाज्योति योजनेचा बट्टाबोळ झाला आहे. सभेचा थांगपता विधर्थ्यांना काय तर संचालक मंडळातील सद्यस्याला ला सुद्धा राहत नाही ही शोकांतिका, मागील वर्षी महाज्योति ला १५५ कोटी मंजूर झाले पण त्या साठी प्रभावी पणे अमलबजावणी करण्यात आली नाही.
महाराष्ट्रातील विद्यार्थी बार्टी आणि सारथी संस्थेप्रमाणे आम्हाला ही मदत करा अशी विनंती करत आहे मात्र उर्मट व्यस्थापकिय संचालक आणि व्यस्थ अध्यक्ष यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सव्वाशे कोटी परत गेले, महाज्योति संस्था प्राप्त निधी खर्च करू शकला नाही त्यामुळे संबंधित व्यस्थपिकिय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व त्यांना कार्यमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्च्या वर्धा जिल्हाध्यक्ष तुषार पेंढारकर यांनी केली आहे.