श्रीकांत तोटे
पवनार : काही दिवसापुर्वी पवनार हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. रुग्णसंख्याय झपाट्याने वाढण्यास सूरवात झाली होती. कडक निर्बंध आणि उपाययोजनांमुळे यावर पायबंध घालन्यास मदत मिळाली. पवनार आता काही दिवसात कोरोनावर मात करणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना रुग्ण वाढीला लागला ब्रेक लागला आहे.
एप्रिल महिन्याच्या सहा तारखेपासून पवनारत झपाट्याने कोरोणा रुग्णाची वाढ सुरू झाली दररोज 15 ते 20 रुग्ण निघू लागले, त्यामुळे काही एरिया प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे लागले. गावातच तपासणी होऊ लागल्याने आकडेही लगेच मिळू लागले. पोझितिविटीचा रेशो 20 टक्याच्या वर गेल्यामुळे उपाय योजना करण्यासाठी प्राथमिक उपकेंद्र व ग्रामपंचायत प्रशासन संयुक्तरित्या काम करणे गरजेचे होते.
परंतु समन्वयाचा अभाव असल्याने एक मेकविषयी तक्रारी झाल्या त्यातूनच डॉक्टर रश्मी कपाले यांची बदली झाली व नंतर डॉक्टर इंगळे यांनी पदभार स्वीकारला व इथूनच परिस्थिती सकारात्मक रित्या बदली लागली. डॉक्टर इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ग्राम पंचायत प्रशासनाला विश्वासात घेऊन कृती आराखडा तयार केला. ट्रेस, टेस्ट व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करून रुग्ण संख्या आटोक्यात आणली. सध्या अॅक्टिव रुग्ण संख्या 18 असून पैकी तीन रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे. व 15 रुग्ण गृह विलागिकरन मध्ये आहे. जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते.
एक मात्र खरे की संस्थात्मक विलिगाकरन मध्ये कुणी राहायला तयार नाही. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने सक्षम शाळेत संस्थात्मक विलगीकरणाची सोय करण्यात आली असल्याचे ग्राम विकास अधिकारी श्री डमाळे यांनी सांगितले.