वर्धा : जिल्ह्यात १८ मे पर्यंत कडक लॉकडाउन लागल्याची माहिती वेळेत मिळाली नसल्याने शेतकर्याने शेतमाल विक्रीकरीता तोडून ठेवला. मात्र येन वेळेवर लॉकडाउन वाढल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतमाल फेकुण देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
पवनार येथील शेतकरी सुरेन्द्र भट यांनी आपल्या शेतात पत्ताकोबीच्या पिकाची लागवड केली. लॉकडाउन खुलनार या आशेने त्यांनी आपल्या मिनी ट्रँक्टमध्ये ट्रॉली भरुन पत्ताकोबी तोडून ठेवली मात्र वेळेवर लॉकडाउन वाढल्याची बातमी मिळाली. तरीही दोन दिवसात जिल्हा प्रशासन आपला निर्णय बदलेल आणि शेतकर्यांना भाजीपाला विक्रीची परवानगी देईल या अपेक्षेत शेतकर्याने धीर सोडला नाही मात्र आता चार दिवस लोटले तोडून घरी आणलेली पत्ताकोबी सडण्यास सुरवात झाली त्यामुळे काही फेकुन द्यावी लागणार आहे तर काही जनावरांना टाकण्याशीवाय पर्याय नाही.
आधीच शेतकर्यांवर निसर्गाचा कोप चालू आहे आणि या लॉकडाउनच्या काळात अस संकट कोळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या कठीण परिस्थितीत शेतकर्यांनी काय करावे कुठे जावे आणि कसे जगावे असा प्रश्न आता शेतकर्यांसामोर उभा ठाकला आहे. यावर जिल्हाप्रशासनाने विचार करुन यावर तोडगा काढत कडक लॉकडाउन रद्द करावा आणि शेतकर्यांना भाजीपाला विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
- खरीपाची पेरणी करण्याकरीता बी-बीयाण्यांची सोय व्हावी म्हणून मोठ्या मेहनतीने हे माळव लावल होत. पत्ताकोबीचे पिक बर्यापैकी हातीत आल होत. याच्या विक्रीतुन ३० हजाराच उत्पन्न येणार होत. मात्र या लॉकडाउनमुळे फार मोठे नुकसान झाले हे नुकसानभरपाई करायची कशी हाच विचार चालू आहे.
सुरेन्द्र भट, शेतकरी पवनार