पवनार : चार दिवसापुर्वी झालेल्या वादळी पावसाने परिसरातील अनेक घरांचे तसेच शेतबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात शेतकरी सुनिल निंबाळकर या शेतकर्याचे सर्वात जास्त नुकसान झाले होते. दोन एकर शेतात केळी व पपईच्या पिकाची गारपीटमुळे संपुर्ण बाग उध्वस्त झाली होती. या धक्क्याने शेतकरी पुरता खचुन गेला होता. जिल्ह्याचे पालक मंत्री सुनिल केदार हे जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांनी या उधवस्त झालेल्या बागेची पाहणी करुन शेतकर्याला संपुर्ण नुकसान भरपाई मिळेल काळजी करु नका असे आस्वस्त केले.
या वादळी पावसात परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले होते. अनेकांच्या घराचे छप्पर उडाले तर अनेकांच्या भिंतीत कोसळल्या होत्या पालकमंत्र्यांनी यावेळी परझड झालेल्या घरांची पाहणी केली. नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापनेतून सर्वांना मदत मिळेल असे यावेळी ते म्हणाले. यावेळी एका विधवा महिलेने राशनकार्ड बाबत आपली व्यथा मांडली असता आजच्या आज महिलेला राशन कार्ड बनवून देण्याचे आदेश यावेळी पालक मंत्यांनी संबंधीत अधिकार्यांना दिले.
येथील लोकप्रतिनीधींच्या वतीने गावात लसीकरन केंद्र सुरु करुण ग्रामस्थांची होणारी फरपट थांबविण्याची मागणी केली. तसेच वादळी पावसात झालेल्या शेतातील विज खांब पडले त्याचे काम अद्याप पुर्ण झाले नसल्याने शेतातील भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येत असल्याच्या व्यथा मांडल्या त्यामुळे ही अडच लवकरात लवकर सोडवावी असे निवेदन पालकमंत्यांना दिले. त्यांनी तात्काळ संबंधीत अधिकार्याला याबाबत सुचना केल्या आज शेतातील विजपुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगीतले.
पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिलेल्या आश्वसनामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाल्याने यावेळी त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. यावेळी, सरपंच शालिनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य अर्चना टोणपे, पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, माजी पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम टोणपे, ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर, कृषिसहायक विद्या वैद्य, तलाठी सुनिल भोयर, परिसरातील शेतकर्यांसह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.