वर्धा : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच संसर्ग साखळीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात पाच दिवस कडक निर्बंध लागू केले होते. ८ मे सकाळी ७ पासून १३ मे सकाळी ७ पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहणार होते मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने आनखी पाच दिवस म्हणजेच १८ मे सकाळी ७ पर्यंत हे आदेश लागू असनार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.
Home ◼️ संपादकीय जिल्ह्यात १८ मे पर्यंत राहणार कडक निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; घराबाहेर पडल्यास...