वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कामगार सुविधा केंद्र वर्धा येथील किरायाच्या इमारतीवर होणारा कोटी रुपयांच्या खर्च थांबवण्यात यावा अशी मागणी भिम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनातून करण्यात आलेली आहे.
किरायाच्या इमारतीवर कामगार अधिकारी येवढे मेहेरबान का? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कामगार सुविधा केंद्राची इमारत हे कोणत्या तरी कामगार अधिकारी किंवा त्याच्या परिवारातील नातेवाईक सदस्यांचे आहे तेव्हाच येवढा मोठा खर्च याय इमारतीवर करण्यात येत असल्याचाच आरोप भिम आर्मीने केला आहे.
या कार्यलयासोबत घर मालकांचे किती महिन्यासाठी करार झालेला आहे. नियमानुसार घरमालक याच्या सोबत 11 महिन्याचा करार केला जातो सध्याच्या कार्यलयाला 1 वर्षाचा कालावधीतच त्यावर कोट्यावधी रुपयांची उधळन का होत आहे. येथील अधिकार्यांच्या सगमताने तर हा खेळ चालू नाही अशी शंका व्यक्त होत आहे. या इमारतीला इतका खर्च झाल्यानंतर घर मालकाने जर त्याची घर परत मागितले तर कोटीचा खर्च तर वाया जाणार आहे.
यावेळी निवेदन सादर करताना भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के, जिल्हा महासचिव राज मून, शेहबाज शेख, अकरम शेख, बंटी रंगारी, अक्षय हुमने, शशांक भगत, आशिष धनविज, दीक्षित सोनटक्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
………………..
या कार्यालयाला भ्रष्टाचाराची लागन झालेली आहे हे अनेक वेळा सामोर आले आहे. फसवणूकीची अनेक प्रकरने बाहेर येत आहे. कमिशन एजंटच्या माध्यमातून सर्वसामान्य मजुर वर्गांना लूटण्याचा गोरखधंदा या विभागाकडून होत आहे. इमारतीवर होणारा खर्चातील कमिशन अधिकार्यांच्या खिशात जाणार असल्याने हा येवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे यातून स्पष्ट आहे. कोविडं19 च्या काळात इतर निधी सामान्य जनतेच्या मदतीसाठी वापरला जात आहे आणि जनतेच्या टॅक्स मधून जमा होणार पैसा हा असा खर्च केल्या जात असल्याचा आरोप होत आहे.