फ्रंटलाइन वर्कर्ससाठी १० टक्के बेड राखीव ठेवा! आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

वर्धा : फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक, महसूल कर्मचारी, पोलीस आदी सेवा देत आहेत. पण याच फ्रंटलाइन वर्कर्ससह त्यांच्या कुटुंबातील गंभीर कोविडबाधितांना वेळीच रुग्णखाटा मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोविड रुग्णालयात १० टक्के रुग्णखाटा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने रेटण्यात आली. फ्रेंटलाइन वर्कर्सने सोमवारी त्यासाठी काळी फीत लावून आंदोलन केले.

दिवसेंदिवस कोरोनाबाघितांची संख्या वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल झाल्या आहेत, इतकेच नव्हे तर रुग्णखाटा मिळविण्यासाठी सध्या रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांची अटकंती होत आहे. अशाही परिस्थितीत फ्रुंटलाइन वर्कर्स स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड रुग्णालयात किमान १० टक्के ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व दिलीप उटाणे, सिद्धार्थ तेलतुबंडे, दीपक कांबळे, वंदना उईके, गजानन थुल, अरविंद बोटफुले, वैभव तायवाडे, रवी चंदे, नीलिमा तातेकर, संगीता रेवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here