

पुलगाव : घरात अनाधिकृतपणे प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पुलगाव येथे ही घटना घडली. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी असताना नितीन पसरकर याने अनाधिकृतपणे घरात प्रवेश करीत पैसे दाखवून पीडितेचा विनयभंग करीत असभ्य वर्तन केले. पीडितेने याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.