राहुल काशीकर
वर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेत शासनाने केलेले लॉकडाऊनमुळे धोबी समाजाचा पारंपारिक व्यवसाय कपडे प्रेस आणि धुलाई करणे हे सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. व्यवसाय बंद असल्याने कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न धोबी समाजा सोमोर उभा आहे. राज्य सरकारने हा आर्थिक परिस्थितीत सापडलेल्या धोबी समाजाला व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अथवा शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी धोबी समाजाकडून होत आहे.
अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत, कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे गेल्या एक वर्षांपासून धोबी समाजाचे लॉन्ड्री व्यवसाय पूर्ण ठप्प पडले आहे. माध्यस्थीकाळात व्यवसाय सुरु होताच, पुन्हा लॉकडाऊन लागल्याने पुन्हा एकदा परीट धोबी समाजावर आर्थिक अडचणीत सापडला. बँकेचे घेतलेले कर्ज, वीजबिल, दुकानाच्या रूमचे किराया, मुलांचे शिक्षण आणि उसनेवारी घेतलेला पैसे आता परत द्यायचे कसे व कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आत्महत्या सारखे उपाय शिल्लक राहिले असल्याचे बोलले जात आहे, राज्य सरकारने धोबी समाजाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
गेल्या एक वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय बंद असल्यामुळे समाज आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे
समाजबांधव पूर्णपणे खचलेले आहेत धोबी समाज हा अतिशय गरीब आहे, समाजाचे उदरनिर्वाह फक्त व्यवसायावर अवलंबून आहे, शासनाने व्यवसाय सुरु ठेवण्याची परवागी द्यावी.
कुणाल दुरतकर , वर्धा तालुका प्रमुख डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र वर्धा
———
धोबी समाजातील अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे, कपडे प्रेस करणाऱ्या दुकानावर गर्दी सुद्धा होत नाही, ग्राहक आपले कपडे दिले की, निघून जातात, यामुळे व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी नियमाचे पालन करून धोबी समजातील व्यावसायिकाला व्यवसाय करण्यास परवागी शासनाने द्यावी..
संजू भोवरे, महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज, ( सर्वभाषिक) वर्धा
——
लॉकडाऊनमुळे लोक घराच्या बाहेर पडण्यासाठी टाळत आहे, गेल्याएक वर्षांपासून मोठ्या कार्यक्रमावरीही बंदी आहे, परीट समाज्याच्या बांधवाना व्यवसायापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. समाजाला शासनाने आर्थिक मदत द्यावी.
राहुल पाटणकर, जिल्हा सचिव डेबूजी युथ ब्रिगेड वर्धा