वर्धा : टिप्परने धकड दिल्याने झालेल्या अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येळाकेळी येथे घडली. अपघात इतका भीषण होता टिप्पर पुलावरून नदीत पडला. वासुदेव संभाजी शेंडे (वय ४८) रा. येळाकेळी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिप्पर क्रमांक एमएच ४० बीएल ७२०२ हा वर्धेहून आर्वीच्या दिशेने जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून पायदळ येत असलेल्या व्यक्तीला टिप्पने घडक दिली. यामध्ये टिप्पर धडक दिलेल्या व्यक्तीसह पुलावरून नदपात्रात पलटी झाले. व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामध्ये चालक जखमी झाला. वृत्तलिहस्तोवर चालकाचे नाव कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहेत.