कान्हापूर : येथील वंदना सातपुते यांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीने आलिल्या चोरट्यांनी पळून नेली होती. या प्रकरणातील सर्वच आरोपींना हूडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बळ १ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कान्हापूर येथील वंदना सातपुते यांच्या तक्रारीवरून सेलु ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरूकरण्यात आला. स्थानिक गुन्हे झाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गाठून मिक्खन उर्फ लखन नाथुलाल सोलंकी (१९,) रा. कामठी, पप्पु श्यामलाल बुरडे (२१) रा. नागपूर व गणेश रविंद्र सोनकुसरे (२७) रा. नागपूर यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने, एक मोठा चाकू, एक मोबाईल, रोख १ हजार १०० रुपये आदी असा एकूण १ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांनाही सेलू पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सौरभ घरडे, सलाम कुरेशी, अशोक साबळे, संतोश दरगुडे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, गजानन लामसे, रणजित काकडे, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, प्रमोद पिसे, अनिल कांबळे, मनिश श्रीवास, श्रीकांत खडसे, अविनाष बन्सोड, रामकिसन इप्पर, दिनेश बोथकर, नीतेश मेश्राम, पवन पत्रासे, गोपाल बावणकर, अभिजीत वाघमारे, नवनाथ मुंढे, अमोल ढोबाळे यांनी केली.