
वर्धा : पैशांचा पाऊस पाडल्याप्रकरणी पोलिसांनी अघोरी विद्या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केली आहे. पीडितेची आई आणि सुदामपुरी येथील महिला यांना दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते, मात्र मंगळवारी सकाळी त्या महिलेस न्यायालयात हाजर करण्यात आले त्यांची जामिनावर सुटका झाली. अघोरी विद्याचा वापर करून २१ वर्षांच्या मुलीचे दोन वर्षांपासून शोषण होत होते. या प्रकरणात पीडितेची आई, काका, काकू, तांत्रिक आणि इतरांचा समावेश आहे.
हे प्रकरण उघडकीस येताच रामनगर पोलिसांनी पीडित मुलीचे काका आणि बाळू ऊर्फ प्रवीण मंगरूळकर यांना ताब्यात घेतले. दुसर्या दिवशी प्रवीणचे दोन साथीदार दीपक कांबळे आणि पंकज पाटील यांनाही अटक करण्यात आली. पीडितेची आई सोमवारी आणि एक 37 वर्षीय महिला मंगळवारी सकाळी सुदामपुरी येथील रहिवासी पोलिसांना अटक करण्यात आली होती यात आईसह चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.