सतीश खेलकर
पवनार : रुग्णालयाच्या अनास्थेने येथील ७० वर्षीय संतोष मरसकोल्हे रा. पवनार यांचा बळी घेतल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. प्रशासनाकडून सर्वकाही ‘अॉल इज वेल’ चालू असल्याचा आव आनल्या जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र हाताबाहेर गेली आहे.
श्री मरस्कोल्हे यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होवू लागल्याने त्यांच्या घरच्यांनी शहरातील खाजगी रुग्णालय गाठले मात्र कुठेही त्यांच्यावर उपचार झाला नाही. त्यांना सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. कस्तूरबा रुग्णालयात रुग्णाला आनताच चला पेशन्टला बाहेर काढा येथे बेड, ऑक्शिजन, वेन्टीलेटर आहीच उपलब्द्ध नाही पेशन्टलाटल दुसरीकडे घेवून जा असा सल्ला दिला मात्र रुग्णाची साधी तपासनीही केल्या गेली नाही. यावरुन रुग्णालयाची रुग्णाप्रतीची अनास्था तिसून आली.
यानंतर श्री मरसकोल्हे यांना त्यांच्या आपतांनी वापस घरी आनल बाहेरुन ७ हजार रुपयाला ऑक्शिजन आनुन घरीच ऑक्शिजन लावल मात्र प्रकृती खालावतच असल्याने त्यांच्या आपतांनी संपर्कातील व्यक्तिंना रुग्णालयात कुठे बेड मिळेल का म्हणुन विनवनी केली असता अमरावती जिल्ह्यात एक बेड असल्याची माहिती मिळाली रुग्णाला तेथे नेण्याकरीता वेन्टीलेटर उपलब्ध असलेली अॅम्बूलन्स पाहिजे होती. सावंगी येथील अँम्बूलन्समध्ये नेण्याकरीता त्यांना सावंगी येथे नेण्यात आले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी सात वाजेपासुन संतोष मरसकोल्हे यांना कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळाला नाही. त्यांना सगळीकडेच हेडसांड करण्यात आली. परिणामी दुपारी ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे याचे परिचय झाला. त्यामुळे संतोष मरस्कोल्हे हे रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचे बळ ठरल्याच सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणाने आरोग्य विभागाविषयी नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णांना बेड मिळणे त्यातही अतिदक्षता विभागात जागा मिळणे कठीण होऊन बसले आहे. जिल्ह्यात दररोज चारशच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढू लागल्यानंतर आता बेड मिळण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरु झाली आहे.
दुसरीकडे, मधुमेह व उच्चरक्तदाबासह विविध आजार असलेल्या पन्नाशीपुढील बहुतेक रुग्ण ज्यानान कोरोनाची लागन झालेली नाहीह मात्र त्यांना उपचाराची गरज आहे अशाअश रुग्णांनाही आता उपचार घेता येत नसल्याने त्यांचाहीह जीव जाण्याची वेळ आलेली आहे.
……………..
प्रतिक्रीया
माझ्या वडिलांना अचानक श्वास घ्यायला त्रास झाल्याने आम्ही आधी शहरातील खाजगी व नंतर सेवाग्राम रुग्णालयात घेवून गेलो मात्र तिथे बेड उपल्बध नसल्याचे सांगत आमच्याय पेशन्टवर कोणत्याच प्रकारचे उपचार केला नाही. उलट उतिशय उद्धट प्रकारे आम्हाला वागणूक मिळाली त्यांनी वेळीच उपचार केला असता तर बाबांचा जीव वाचला असता.
पंकज मरस्कोल्हे, मुलगा