वर्धा : मानवतेचा संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. दिवसभरातील पाच वेळा नमाज अदा केल्यानंतर तरावीहच्या विशेष नमाजला सुरुवात होईल. कोविडच्या सावटाखाली रमजान महिना सुरू होत असला तरी शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कायर्क्रम महिनाभर चालणार आहेत. मुस्लीम दिनदशिर्केनुसार, रमजान-उल-मुबारकचा मुकडस नववा म्रहिना असतो. दया आणि प्रामाणिकतेची सुरुवात या महिन्यापासून होते. रमजान हजरत मोहम्मद सल्ललाह अलैवसल्लमच्या उमतचा महिना आहे. सूर्योदयापूर्वी सहेरी तर सूर्यास्तानंतर रोजा इफत्तारी केली जाते. रमजान महिन्यात उपासनेला फार महत्त्व असून, नियोजित पाच वेळा नमाजपठण करण्यास खूप महत्त्वपूर्ण मानले जाते.
घरीच करावे नपाजपठण
केवळ रमजान महिन्यात दिवसातील पाच नमाजशिवाय रात्री विशेष नमाज अदा केली जाते. या विशेष नमाजला नमाज-ए- तरावीह असे म्हणतात. रमजान महिन्यातील रोजा, नमाज, तरावीह आणि फितरा (दान) यामुळे रोजादारांचे मन संतुष्ट व समाधानी होते. तरावीह नमाज पठणात संपूर्ण कुराणाचे पठण होते. ब्रेक द चेन आदेशानुसार धार्पिक स्थळांमध्ये केवळ पाच जणांना नमाजची परवानगी आहे. मुस्लींम बांधवांनी घगतच नमाजपठण करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे
रोजाचे वेळापत्रक जाहीर
महिनाभरातील उपवासाचे वेळापत्रक धर्मगुरूनी नुकतेच जाहीर केले , मशिंदीमध्ये धर्मगुरू म्हणून काम पाहणार्या मोलानांच्या संघटनेने हे वेळापत्रक तयार केले आहे. नागरिकांनी या वेळापत्रकानुसारच रोजाची सहेरी करावी तसेच इफ्तार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिनाभर उपवास
संपूर्ण महिनाभर उपवास केले जातात. सहेरी झाल्यानंतर इफ्तारीच्या वेळेपर्यंत अन्न, पाणी ग्रहण केले जात नाही. इस्लाम समाजातील पाच आरकानांपैकी रोजा एक मानला जातो. इमान, नमाज, रोजा, हज, जकात असे पाच महत्त्वपूर्ण अरकान रमजान महिन्यात आहेत. रमजानचे पहिले दहा दिवस भक्तीचे तर उर्वरित दहा दिवसांमध्ये रोजेदराचे संरक्षण केले जाते. रब्बे कद्र आणि बरकतवाली रात या महिन्यातील दोन रात्री नागरिकांना ईश्वरीकृपेची देणगी मिळत असते.