समुद्रपूर : माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. धुमनखेडा येथे ही घटना घडली. पती रविंद्र मांगीलाल राऊत, बेबी राऊत, अर्चना राऊत, सुनीता काळे, धुरसु काळे, सुकती भोसले, परमेश्वर भोसले यांनी विवाहितेला तुला मुलं बाळ होत नाही असे म्हणून नेहमी त्रास द्यायचे.तसेच पैश्यासाठी व सोन्याचे दागिने आणण्यासाठी नेहमी छळ करीत मानसिक त्रास द्यायचे. अखेर विवाहितेने याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रार दिली आहे.