वर्धा: ‘ब्रेक द चेन’चा आदेश निर्गमित करून राज्यात मिती लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण याच मिनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून वर्धा नगरपालिकेने वर्धा शहरातील तब्बल आठ दुकानावर दंडात्मक कारवाई करून ही व्यावसायिक प्रतिष्ठाने सील केली आहे.
पालिकेच्या या कारवाईमुळे वर्धा शहरातील व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यावश्यक सेवेची प्रतिष्ठाने वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत.
परंतु, याच नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने वर्धा न.प.च्या निखील लोहवे, गजानन पेटकर, भुषण चित्ते, अजिंक्य पाटील यांनी पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांच्या सहाय्याने आठ दुकानांना सील ठोकुन व्यावसायिकांना दंड ठोठावला.