

समुद्रपूर : भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. चंद्रपूर ते जाम मार्गावर हा अपघात झाला. प्रफुल पुंडलिक काळे हा कुल्फी विकण्यासाठी दुचाकीने नारायणपूर येथे एम.एच.3२ एक्स. ९८७६ क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता.
कुल्फी विकून तो परत गावाकडे येत असताना जाम ते चंद्रपूर रस्त्यावर मेंदुला पाटी नजीक चंद्रपूरकडून जामकडे भरधाव जाणाऱ्या एम.एच.४० बी.एल, ८१४४ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचालक नितीन पहानपाटे याने निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून प्रफुल चालवित असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली.
यात प्रफुल काळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल मून याच्या तक्रारीहून समुद्रपूर पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालका विरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.