वर्धा : मुलीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेस दोघांनी तब्बळ १३ लाख ५० हजार रुपयांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सुनीता भास्कर देहारे ही रविंद्र गुजरकर याला वर्धा बसस्थानकावर भेटला होता. त्याने कुणाला रेल्वेत नोकरी लावून द्यायची आहे का असे म्हटले, दरम्यान सुनीताने माझ्या मुलीला नोकरी पाहिजे असे म्हटले. दरम्यान रविंद्र मुजरकर याने नोकरीचे प्रथम पत्र तुम्हाला पुरी येथून मिळेल असे सांगितले. सुनीता ही मुलीला घेवून पुरी येथे गेल्यानंतर त्यांना तेथे मयुर वैद्य हा भेटला त्याने मुलीला मेडीकलला पाठवून रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला नियुक्ती पत्र मिळेल असे सांगितले.
रिपोटींगसाठी तुम्हाला रांची झारखंड येथे जावे लागेल असेही त्याने सांगितले, दरम्यान मयुरने पैशाची मागणी केली असता सुनीताने त्यास २ लाख ६६ हजार रुपये दिले. रविंद्र गुजरकर याच्या संगण्याहून सुनीताने तब्बल १३ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. पण, नियुक्ती पत्र मिळाले नाही. सुनीताने चौकशी केली असता मयूर वैद्य आणि रविंद्र गुजरकर या दोघांनी बनावट दस्तावेज तयार करून शासकीय नोकरी लावण्यचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच सुनीता देहारे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.