

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एका २१ वर्षीय माहेरवासिनीला चार लाख रुपयांसाठी तगादा लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिमुकल्या मुलीच्या अंगावरही रॉकेल टाकण्यात आले. दारव्हा तालुक्यातील सावंगी रेल्वे येथे १९ मे २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. नांदगाव पोलिसांनी आरोपी संतोष येळे, दादाराव येळे, काशीराम येळे, रवींद्र येळे, योगेश येळे व एक महिला (सर्व रा. सावंगी रेल्वे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर विवाहितेला मुलगी झाली म्हणून देखील मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली.