माय-लेकीस केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

वर्धा : फोन का लावू दिला नाही, असे म्हणत महिलेने माय-लेकीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. इंदिरानगर परिसरात ही घटना घडली.

अनुसया पारिसे हिच्या घरी शालु नामक महिलेने प्रवेश करीत तिच्या मुलीस बेदम मारहाण केली. अनुसयाने मारहाण करण्यास हटकले असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here