
मौदा : क्षुल्लक कारणावरून दोघांनी तरुणास मारहाण करीत जखमी केले. ही घटना अरोली (ता.मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमान येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मिथुन राजकुमार चौरे (3०, रा. बागडीपार शांतिनगर, नागपूर) असे जखमी तरुणाचे नाव असून, सरताज ताराचंद रंधई (२४) व विजय चंद्रभान वानखेडे दोघेही रा. तुमान, ता. मौदा, अशी आरोपींची नावे. आहेत. आरोपींनी मिथुन चौरे याला रस्त्यात थांबवून ‘तू मला शिवीगाळ का केली’ असे म्हणून त्याला हातबुक्कीने व दगडाने मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
याप्रकरणी अरोली पोलिसांनी भादंवि कलम ३४१, ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस हवालदार भगवान चांदेवार करीत आहेत.