गव्हापेक्षा सरकी ढेप महाग अन् दुध बिसलरीपेक्षा स्वस्त; दूध उत्पादकांचे हाल

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय दरवर्षी तोट्याचा ठरत आहे परिणामता अनेक शेतकरी जोडधंदा म्हणुन दुग्ध उत्पादनाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र यातही येणाऱ्या अडचनी काही बळीराज्याची पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. माणसाच्या वैरणापेक्षा जणावरांच्या वैरणाचा खर्च महागला आहे. गव्हापेक्षा सरकी ढेप महाग झाल्यांने आणि बिसलरी पेक्षा दुध स्वस्त असल्याने उत्पादन खर्च आणि उत्पादीत मालाच्या विक्री यातील फरकाचा तलमेल कसा बसवावा आणि परिवाराचा गाडा कसा चालवायचा असा मोठा यश प्रश्न गोपालकांन पुढे उभा ठाकला आहे.

सविस्तर वृत्त असे की, भरोशाची नसलेल्या शेती व्यवसायातुन शेतकर्याना उदरनिर्वाह करने कठीण झाले आहे परिणामता जोडधंदा म्हणून अनेक छोट्या मोठ्या शेतकर्यानी दुग्ध व्यवसायाला पसंती दिली आहे कारण शेतकर्याला जनावरांसाठी चारा-पाणी आणि या जनावरांची निवासाची व्यवस्था करणे काही कठीन जात नाही शिवाय यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बहुतांश कामे हे यंत्राच्याच साह्याने कमी वेळात केले जात आहे.

परिणामता शेती कसण्यासाठी लागणार्‍या जनावरांची संख्या बहुतेक शेतकर्याकडे कमी झाली आहे. यामुळे शेतीवर असलेला सालगड्याचे कम कमी झाले आहे. सालगडी आणि स्वतः राबणारा शेतकरी असा दोघाहीकडे भरपुर वेळ उपलब्ध झाला आहे. यामुळे सोपी आणि सर्वाना जमनारा जोडव्यवसाय म्हणुन दुध उत्पादन व्यवसाय जवळचा वाटतो आहे. यात अनेक शेतकर्यांनी जम बसवला असुन सर्वसाधारन दुध उत्पादकाकडे आज पन्नास लिटर दुध सर्रास उपलब्ध आहे. मात्र येथेही या होतकरु शेतकर्यांच्या नशीबाची साडेसाती काही संपता संपत नाही.

उत्पादन खर्च आणि उत्पादीनातुन मिळणारी रक्कम यात दिवसेंदिवस मोठे अंतर पडत चालले आहे. आज घडीला माणसाच्या वैरणाची म्हणजे गव्हाची किमंत पतवारी पाहुन १८ ते २३ रुपये किलो आहे. तर गुरांचे वैरन म्हणजे सरकी ढेप पतवारी पाहुन २५ ते ३० रुपये किलो पर्यंत पोहचली आहे. आणि ग्रामिन भागातील सरकारी किवा खाजगी दुध संकलन केद्रावर पतवारी पाहुन १८ रुपये प्रती लिटर पासुन पुढे दुध खरेदी केल्या जात आहेत. यापेक्षा फिल्टर बाटलीबंद पाण्यांची किमंत कितीतरी जास्त आहे.

याशिवा दुग्ध जनावरांच्या इतरही वैरणाच्या किमंती गगनाला भिडल्या आहे. ज्यात चांगल्या प्रतीचे सुग्रास,डेरी स्पेशल पॅलेट, जवस ढेप, शेंगदाणा ढेप, मका, तुर, हरभरा, उडीद, मुंग आदी चुन्नी, गव्हाचे चोखर, धानाचे कुकूस आदीच्या दरात सुध्दा मोठी वाढ झाली आहे. शिवाय कॅल्शियम, मीनरल पावडर आदींच्या किमंती सुध्दा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. ऐवढेच काय तर दुधाच्या जणावराला पुरणपोळी असलेला हिरवा चारा मका आणि हरभर्याचे कुठार एक बल्लेरो पीकप गाडी ७ ते १० हजार रुपये दराने खरेदीदार हाजीहाजी करतांनाचे चित्र आहे. लगतच्या हरभरा उत्पादनात अग्रेसर गवुळ-भोसा शिवारातुन भंडाऱ्यापर्यत कुठार विकल्या गेल्याचे कळते.

अशा महागाईमुळे जोडधंदा म्हणुन दुध उत्पादनाचा व्यवसाय करु पहाणार्‍या किवा करीत असलेल्या गोपालकात कमालीची निराशा पसरली आहे. नाईलाजास्तव गोपालक हा व्यवसाय कसाबसा करीत आहेत मात्र खर्च आणि मिळकत यातील दरी अशीच वाडत राहली तर या व्यवसायाचे काही खरे नाही ऐवढे मात्र खरे. अगोदरच कंबरडे मोडलेल्या बळीराज्याला शासणाने जोडधंद्यात तरी हात देवुन जगण्यासाठी तरी उभे करावे अशी दुध उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक आहे.

“मी सुशिक्षित बेरोजगार असल्यांने घरच्या शेतीसोबत आधुनिक पध्दतीने दुध व्यवसाय करतो मात्र वैरांनाचे आणि इतर पुरक बाबीवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत दुधाच्या कमी भावाने फटका बसत आहे. विदर्भातील कडक उन्हाळा पाहता जास्त दुध देणाऱ्या गाईची विशेष काळजी घ्यावी लागते परिणामता खर्चात पुन्हा वाढ होते यातुलनेत दुधाचे दर वाढने अगत्याचे झाले आहे.”

भुषण ठाकरे, दुग्ध उत्पादक शेतकरी
सिंदी रेल्वे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here