

वर्धा : दुचाकीला कट का मारला अशी विचारणा करणाऱ्या तिघांना लाथाबुक्क्यांनी व रॉनडे मारहाण केली. महाकाळ कॅनलजवळ ही घटना घडली. स्वप्नील सुरजूसे हा येळाकेळी रस्त्यावर दुचाकी घेवून मित्रांसह बोलत असताना समोरून भरधाव आलेल्या कारने कट मारला, ती गाडी समृद्धी हायवेवरील असावी असा अंदाज घेवून स्वप्नील व त्याचे दोन मित्र कॅम्पजवळ गेले असता कार तेथे उभी दिसली.
स्वप्नीलने कार कुणाची आहे, अजनी विचारणा केली असता नरेंद्र सिंह वर्धनसिंह पूनम सिंह, कुंदनसिंह चेतन सिंह सोढा, हजार सिंह नारायणसिंह सोळंकी यांनी स्वप्नील व त्याच्या दोन मित्रांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.