

वर्धा : लग्नसोहळ्यासाठी अवघ्या ६० व्यक्तींची उपस्थिती क्रमप्राप्त असतानाही लग्नाचे औचित्य साधून नागरिकांची गर्दी केल्याचा ठपका ठेवून पवनार येथील वाघमारे कुटुंबाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी राजू झामरे, तलाठी शरद तिनघसे, राजेश खामनकर, चौधरी यांनी केली. या कारवाईमुळे पवनार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.