मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : ओलितासाठी शेतकरी पाणी मागतो तेव्हा मिळत नाही परिणामी शिवारातील हजारो एकर शेती पडीक राहते मात्र बोर जलाशयाच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामोर येत आहे.
सविस्तर वृत्त असे की बोर जलाशय पीपरा वितरिकेवर येणाऱ्या शेवटच्या मायनर वरील मौजा सेलडोह शिवारातील मागील काही वर्षांपासून ओलिताची हजारो एकर शेती केवळ आणि केवळ बोर जलाशयाच्या पाणी वाटपच्या ढिसाळ नियोजनचा फटका बसुन पडीक राहत आहे. मात्र याचे बोर प्रशासणाला काहीही सोयरेसुतक नाही.
शेतकरी कपाशी नंतर हरबरा आणि गहू या रब्बी हंगामातील पीकासाठी परिसरातील शेतकरी पाणी मागुन मागुन थकुन जातात मात्र प्रशासनाला काही घाम फुटत नाही आणि पाणी काही मिळत नाही. मात्र वराती मागुन घोड दामटवण्यात नेहमी पटाईत असणाऱ्या प्रशासणाचे ठरल्याप्रमाणे रब्बी प्रेरणीचा पुर्ण हंगाम निघुन जातो तेव्हा बोरचे पाणी परिसरातील शेताच्या बांधावर पोहचते हंगामाची वेळ निघाल्याने या पाण्याचा उपयोग करून कोणीच शेतकरी या महागाईच्या काळात वाढलेल्या उत्पादन खर्चात रब्बी पीकाची प्रेरणी करण्याची हिंमत करत नाही. परिणामता हे पाणी एकदोन शेतकर्यासाठी येते आणि त्यांचे ओलित झाले का पुर्ण पाणी वाया जाते.
ही सर्व बाब प्रशासणाच्या डोळ्यादेखतच मागील पाच वर्षांपासून घडत आहेत मात्र निगरगट्ट असलेले बोर पाणी वाटप प्रशासन आणि पाटबंधारे विभाग मात्र आपल्या कुंभकर्णी झोपेतुन उठाला तयार नाही. कधी काळी बोर जलाशयाच्या पाण्याने ओलीताची सोय व्होवुन हिरवार नंदनवन फुलणार्या सेलडोह शिवार आज ओसाड पडले आहे.
केवळ आणि केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुख्य वितरीकेची दैनिय अवस्था झाली आहे तर पाटसर्या तर लुप्तच झाल्यात जमा आहे. ओलिताच्या नियोजनासाठी लावलेले लोखंडी गेट निकृष्ट दर्जाचे असल्याने आज ते जंगुन तुटुन नाहीशे झाले आहे.
तर अनेक जागी मुख्य वितरिका ओलांडण्यासाठी टाकलेल्या पुलाच्या पायल्या तुटुन फुटुन गायब झाल्या आहेत. परिणामता अनेक जागी शेतकर्याना शेतात जाण्यासाठी अडचणीचे झाले आहे. अनेक जागी ओलितासाठी पाणीच येत नाही म्हणून शेतकर्यानी अतिक्रमण करीत पाटसर्याच गिळंकृत केल्या आहे.