हिंगणा : हिंगणा एमआयडीसी परिसरातील सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन व टूथपेस्टचे उत्पादन करणाऱ्या विको लेबॉरेटरीज कंपनीला रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आग आली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आग विझविण्याचे कार्य सोमवारी दुपारपर्यंत सुरूच होते. मशीन, कच्चा व पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. रात्रीला काम बंद असल्याने सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
Home ◼️ संपादकीय विको लेबॉरेटरीज कंपनीला आग! हिंगणा एमआयडीसीतील घटना; मशीन व कच्च्या-पक्क्या मालाची राख