दुचाकी न दिल्याने व्यक्तीस काठीने मारहाण

वर्धा : दुचाकी देण्यास नकार दिल्याने व्यक्तीस दोघांनी मारहाण करीत जखमी केले. मटन मार्केट सिंदी मेघे परिसरात ही घटना घडली. बंडू इंभारे हा दुकान बंद करुन घरी जात असताना सूरज कांबळे आणि एका अनोळखी युवकाने त्याला रस्त्यात अडवून दुचाकी मागितली. बंडूने दुचाकीन देण्यास नकार दिल्याने दोघांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here