पुलगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुलगाव : घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. तेलघाणी परिसरात ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी घरी जात असताना काल्या आणि भुऱ्या नामक युवकांनी तिला रस्त्यात अडवून मोबाईल क्रमांक मागितला. मुलीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करणे सुरू केले. दरम्यान, एक महिला वाद सोडविण्यास गेली असता दोघांनी तिला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here