

वडनेर : धावत्या ट्रॅक्टरवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली, आकाश सरवरे असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, नाना तडस यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शिवा कुडसंगें हे चालवित होते. या ट्रॅक्टर व ट्रालीत काही मजूर होते. भरधाव ट्रॅक्टर बाराभाई शेत शिवारातील पांदण येथे आला असता ट्रॅक्टरवरील स्वप्नील चरडे व आकाश सरवरे हे जमिनीवर पडले. यात आकाश सरवरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अल्लीपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आकाशला तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास अमित नाईक, प्रशांत वैद्य करीत आहेत. तपासादरम्यान काय नवीन पुढे येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.