

सिंदी (रेल्वे) : कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या पाच दिवसापासून दि. 22 ते 26 या कालावधीत वर्धा येथे कोरोना या महामरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सजामाता बहुउद्देशीय सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत वेगवेगळ्या मनोरंजन व प्रभोधनात्मक कलापथकाच्या सायाने नागरिकांना माहिती देण्यात आली यावेळी भारत सरकार व राज्य सरकारच्या कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियान यशस्वीपणे वर्धा येथे संपन्न झाला यावेळी नांदेड जिल्ह्यातील सजामाता बहुउद्देशीय सांस्कृतिक प्रतिष्ठान कलापथकाचा वेगळा उपक्रम नागरिकांना पाहावयास मिळाला आहे.
यावेळी नांदेड येथील कलाकारांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून व विडंबनाच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या नियमांचे पालन करावे तसेच विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे त्याच बरोबर मास्क व सॅनिटायझर चा वापर नियमित करावा असे आव्हान यावेळी कलाकारांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा घाडगे या तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावांत जाऊन कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत सरकारच्या जनजागृती अभियान मोहीम राबवली यामध्ये नागरिकांचा उत्स्फुर्तपणे त्यांना प्रतिसाद मिळाला.
ही मोहीम माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार व प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्या वतीने सजामाता बहुउद्देशीय संस्कृतिक प्रतिष्ठान नांदेड या कलापथकाने वर्धा येथे पार पाडली जनजागृती अभियाना अंतर्गत कोरोना या संसर्गजन्य रोगाचे माहिती यावेळी उपस्थित कलाकार विनोद गोडबोले, गणेश काळे, शिवाजी सलोटकर, बंडू राऊत, योगेश मच्छिंद्र घुगे आणि किरण काटोळे इ.होते. अशी माहिती विनोद गोडबोले आणि योगेश घुगे यांनी दिली आहे.