दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या! डी.बी. पथकाची कारवाई; रुबा चौकातून पळविली होती दुचाकी

हिंगणघाट : येथील रुबा चौकातील एका मोबाईल दुकानासमोरुन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे डी. बी. पथकाने तपासचक्र फिरवून आरोपीस अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आली.

सुशिल दिलीप पाटील (3०) रा.शेगाव (कुंड), असे आरोपीचे नाव आहे. तो सद्या मिलिंद सोसायटी हिंगणघाट येथे राहतो. १६ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रुबा चौकातून एम. एच. 3२ एक्स ६४२० क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली, अशी तक्रार संकेत तानबाजी मून रा. भीमनगर वॉर्ड हिंगणघाट याने दिली होती. पोलिसांनी तपास करुन आरोपी सुशिल पाटील याला अटक केली त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रज्ञांत होळकर, अपर अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम व पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डी. बी. पथकाचे शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे, विशाळ बंगाले, सचिन भारशंकर व सुहास चांदोरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here