चोरट्यांनी बॅटरी लांबविली! सोनेगाव (स्टेशन) शिवारातील घटना

वर्धा : रात्रीच्या आंधाराचा फायदा घेत चोरट्या शेतातील कुंपनाकरीता बसविण्यात आलेल्या सोलर यन्लायजर किटला लागुन असलेली बॅटरी चोरट्यांनी पळऊन नेल्याची घटना बुधवार (ता. २४) सोनेगाव शिवारात घडली.

संजय रोडे यांची शेती सोनेगाव (स्टेशन) शिवारात गावालगत आहे. यांनी काही दिवसापुर्वीच आपल्या शेतात सोलर संच बसविला होता ते शेतात नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बॅटरी लांबविली. या घटनेची तक्रार त्यांनी अल्लीपुर पोलिसात केली आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here