क्षुल्लक वादातून चाकूने केले वार

हिंगणघाट : माझ्याकडे रागाने का पाहतो, असे म्हणत युवकावर चाकूने वार करीत त्यास मारहाण केली. टाका मैदान परिसरात ही घटना घडली. शादाल शेख इकबाल हा खर्रा घेण्यासाठी जात असताना संजय थुटरकर, रोशन आंबटकर, सूरज ऊर्फ शेमड्या, रोशन हेकणे यांनी विनाकारण शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. संजय थुरटकर याने जवळील चाकू काढून शादालवर चाकूने वार करीत जखमी केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here