

चिकणी : येथील वॉर्ड क्रमांक २ मधील जलवाहिनी गेल्या दहा दिवसांपासून फुटली आहे. याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. वारंवार तक्रारी करुनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. वॉर्ड क्रमांक २ मधील गजानन पारोदे यांच्या गोठ्याजवळील नळ जोडणीची जलवाहिनी दहा दिवसांपासून फुटली आहे. यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय आहेत आहे.
तसेच सिमेंटच्या रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने आवागमन करणाऱ्यांना चिखल तुडवावा लागत आहे. विशेष म्हणजे हा गावातील एकमेवर रस्ता असून फुटलेल्या जलवाहिनीने या रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. ही जहवाहिनी तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी मोरेश्वर पारोदे यांच्यासह ग्रावकऱ्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य नितीन भोयर यांच्या अगदी घरासमोरच ही जलवाहिनी फुटली असून दहा दिवसात ती दुरुस्त होऊ शकली नाही. तर सर्वसामान्यांची काय अवस्था राहील, अशी चर्चा आहे.