रोहणा : विषारी औषध प्राशन करून युवकाने आत्महत्या केली. पीयूष भास्कर मांढरे असे मृताचे नाव आहे. पीयूषने शेतात फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. पाऊस थांबल्यावर युवकाचे आजोबा शेतात गेले असता पीयूष पचीत पडलेला दिसून आला. आवींच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असता मृत घोषीत केले.