

आर्वी : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात मिर्झापूर येथील रमेश उईके हा गंभीर जखमी झाला. जखमीला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्वीकडून पुलगावकडे जाणाऱ्या एम.एच. 3१ पी.के. १९९२ क्रमांकाच्या कारने पुलगावकडून आर्वीकडे येणाऱ्या एम.एच. 3२ के. १८६८ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात गोपाल उईके हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. गोपाळ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.