प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मारहाण

हिंगणघाट : प्रेमप्रकरण सुरू असल्याचे घरी का सांगितले असे म्हणून चुलत भावाने भावालाच मारहाण केली. कॉटन मार्केट परिसरात ही घटना घडली. रूपेश कांबळे हा घरी जात असताना चुलतभाऊ विक्की कांबळे हा तेथे आला आणि दुचाकीवर बसवून कॉटन मार्केट परिसरात घेऊन गेले. तेथे अक्षय वासे आणि ऋषी नामक युवक आधीच हजर होते. दरम्यान विक्कीने रूपेशला तू माझे प्रेमप्रकरण घरी का सांगितले, असे म्हणून शिवीगाळ करीत लाकडी बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हाणामारीच्या घटना वाढल्या असून पोलिसांचा धाक नागरिकांमधून कमी झालेला दिसून येतो. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची जरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here