

चिकणी : या परिसरातून निम्न वर्धा प्रकल्पाचा मोठा कालवा गेला आहे. या कालव्यात मंगळवारी पुन्हा एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पंधरा दिवसातील ही चौथी घटना असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चिकणी शिवारातील कालव्यात मृतदेह असल्याची माहिती वीटभट्टीवर काम करणा मजुरांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता वर्धा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.