सेलू : तालुक्यातील तिन मोठ्या ग्रामपंचयतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या येळाकेळी येथे झालेल्या निवडणुकीत १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत १२ सदस्य भाजप समथीँत निवडून आले तर एका जागेवर अपक्ष राहुल येलोरे निवडून आले. या निवडणुकीत सत्ताधारी पँनल एक ही जागा जिकंता आली नाही परंतु सरपंच पदाचे आरक्षण सर्व साधारण असल्याने १३ सदस्य निवडून आलेल्या भाजप समथीँत पँनल मध्ये सर्वच सदस्य सरपंच पदासाठी गुढग्याला बासीग बाधुन असल्याचे सध्याचे चित्र आहे.
यामुळे सरपंच पदाची माळ कुणाचे गळ्यात पडते याचे कडे येळाकेळी येथील नागरीकाचे लक्ष लागले आहे. भाजप समथीँत पँनल मध्ये सरळ दोन गट पडल्याचे चित्र असून एका गटाकडून हितेश, शांताराम भांडेकार, दुसऱ्या गटाकडून भारती देवेंद्र चलाख यांच्या नावाची परिसरात चर्चा आहे.
१२ सदस्य भाजप समथीँत म्हटल्याजात असले तरी काही सदस्य, काँग्रेस विचारसरणीचे तर काही राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही बंजरग दलाचे आहेत यामुळेच सरपंच पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे वेळेपर्यत सांगणे कठीण आहे.
भाजप समथीँत गटाकडून सर्व १२ सदस्याच्या मुलाखती घेण्यात आल्या असून सर्वाची मते जानुन घेण्यात आली तसेच गावातील काही प्रतिस्थिठव्यक्तीचे मते जानुन घेण्यात आली सामान्य आरक्षण असल्यामुळे आणि गावाची लोकसंख्या मोठी असल्यामुळे सरपंच पदी पुरुष असावा काहीचे मत आहे. यामुळे सरपंच पदाची माळ हितेश भांडेकार याचे गळ्यात पडेल असे जाणकारचे मत आहे.