वर्धा : सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल खानगाव येथील पोलीस पाटील मनोज हिवरकर यांना लोक निर्माण व ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातील विविध क्षेत्रात सामाजीक कार्य करनार्या १०१ कार्यकर्त्यांचा या संस्थेने पुरस्कार देवून गैरव केला.
देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार संस्थेच्या वतिने औरंगाबाद येथे देण्यात आला. हा राष्ट्रीय पुरस्कार खानगाव येथील पोलीस पाटील मनोज हिवरकर यांना सुद्धा मिळाला त्यांना हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवराच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या वतिने हा पुरस्कार अँड. मंजुषा गौतम, डॉ. नर्मदा आनंद, पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, नागराज तवर यांच्यासह देशातील 101 गणमान्य व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील खानगाव येथील पोलीस पाटील मनोज हिवरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शेळके साहेब, ठाणेदार अल्लीपुर, पोलीस कर्मचारी अल्लीपुर पोलीस स्टेशन, निरंजन गायकवाड पोलीस पाटील यवतमाळ, दिवाने पाटील, खोंडेपाटील काकडे पाटील, भरणे पाटील, खैरकारपाटील, सचिन क्षीरसागर पाटील, जिल्ह्यातीलसर्व पोलीस पाटील व खानगाव येथिल सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.