शेतातील रोहित्राने घेतला पेट! नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीची शेतकर्यांकडून होती मागणी; महावितरणचा दुर्लक्षित कारभार

कारंजा : सावरडोह येथील शेतात महावितरणचे असलेली रोहित्राने अचानक पेट घेतल्याने जळाले यात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. महादेव खवशी यांच्या शेतातील रोहित्रावर जवळपास 20 ते 25 शेतकऱ्याचे कृषी पंपाची विद्युत पुरवठा केला जातो. सकाळच्या दरम्यान 11 वाजता अचानक रोहित्राने पेट घेतला यात रोहित्र संपूर्ण जळून खाक झाले.

शेतातील गव्हाचे पीक हिरवे असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही थोड्या प्रमाणात गहू जळाला मात्र रोहित्र जळल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विद्युत पुरवठा खंडित झाला. नादुरुस्त रोहित्राची शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण विभागाला याबाबत तोंडी माहिती दिली असता दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे ओव्हरलोड झाल्याने रोहित्राने पेट घेतला असावा असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहे.

शेतकऱ्याचा हिरवा गहु असलेल्याने वाचला शेतातील गहू हिरवा असल्याने आज गहू जळता जळता वाचला जर गहू वाळला असता तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असते यावर्षी शेतातील पिकाने अगोदरच नाकीनऊ आणले आहे त्यात या घटनेत गहू जळाला असता तर शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here