पवनार : गेल्या मार्च महिन्यापासून थकीत असलेले वीजबिल भरलेले नसेल, तर वीज कापण्याची धडक मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. किमान दहा हजार ते तीस हजारपर्यंत ग्राहकाकडे वीजबिल थकीत असल्याने ही मोहीम हाती घेतली असून, शासनाच्या दिशा निर्देश्नप्रमाणे हे सुरू असल्याचे अभियंता कोरे यांनी सांगितले. मात्र वितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन, घरी करता पुरुष नसेल तर महिलांना अर्ध्या तासात संपूर्ण बिल भरा. अन्यथा वीज कापू अशी सूचना देतात बऱ्याच ठिकाणी याबाबत वाद होताना दिसत असून एकाच वेळेस संपूर्ण बिल भरणे कठीण असल्याने हप्ते पडून देण्याची विनंती ग्राहकाने वितरणकडे केली असली. तरी हप्ते पडून देण्यासाठी फक्त मागच्या महिन्यांत सवलत होती असे वितरणकडून सांगण्यात आले.
शासन कोरोना काळातील बिल माफ करेल या आशेवर अनेकांनी वीजबिल भरली नाही. परंतु आता शासनाने घुमजाव केल्याने बिल भरावीच लागणार आहे. नाहीतर महावितरणची वीज कापण्याची टांगती तलवार आहेच. हप्ते पडून वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याची ग्राहक मागणी करीत आहे. महावितरणचे अभियंता कोरे यांनी ग्राहकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर हुलके, मुनेश्वर ठाकरे प्रशांत सावरकर तसेच सुमेरसिंघ ठाकूर, प्रश्नांत चोंदे, निलेश्च हूलके, प्रशांत चोंदे, चंदू ठाकूर हजर होते.