
हिंगणघाट : हिंगणघाट जवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना (ता.११) रात्री ११ वाजताचे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नवनिर्माण अवस्थेत असलेल्या उड्डाण पुलाच्या टोकावर घडली.
यातील मृतक भुषण नथ्थुजी चौधरी वय २५ वर्षे रा.नागपूर व अनिकेत प्रभाकर गांधिलवार वय २६ रा. तुकडोजी वार्ड, नागपूर असे आहे. आकाश दिवाकर वानखेडे वय २५ रा. गोमाजी वार्ड, हिंगणघाट हा गंभीर जखमी असुन त्याला सेवाग्रामला येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतक भुषण व अनिकेत हे नागपूरहुन हिंगणघाटला आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एम एच-३२ ४३६४ ने आले होते. काम संपल्यानंतर ते वडणेर मार्गावरील एका धाब्यावर जेवण करण्याकरीता गेले रात्री हिंगणघाटला परत येता येता हिंगणघाटच्या नांदगाव चौकात उड्डाण पुलाचे काम सुरु आहे त्या पुलाच्या शेवटच्या टोकाला एकमार्गी वळणरस्ता दिलेला आहे तो वळणरस्ता लक्षात न आल्याने भरधाव वेगातील दुचाकी घसरली व रस्ता दुभाजकाला जाउन धडकल्याने भिषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले व एक गंभीर जखमी झाल्याची माहीती पोलिस सुत्रांनी दिली.