वर्धा : येथील इंदिरानमर भागातील रहिवासी असलेल्या शिवाणी विजय रामावत (२२ या विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. घरी कुणी नसताना शिवाणी हिने गळफास घेतला. सदर बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.