वर्धा : वर्धा येथून महिला बसमध्ये बसली असता सावंगी येथून बसमध्ये बसलेल्या दोन महिला चोरट्यांनी प्रवासादरम्यान दागिने असलेली पर्स चोरून नेली. वर्धा ते देवळी प्रवासादरम्यान ही घटना घडली. मनीषा हरिदास धांदे या वर्धा बसस्थानकावरून माहूर ते देवळी बसमध्ये बसल्या. दरम्यान, सावंगी येथून दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यांनी मनीषा हिच्या बॅगची चेन उघडून बॅगमधील १५ ग्रॅम वजनाची ४५ हजार किमतीची सोनसाखळी चोरून नेली. मनीषा धांदे हिने याबाबत देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.