

प्रभाकर कोळसे
हिगणघाट : निसर्गसाथी फाउंडेशन मागील काही वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत असुन निसर्ग चक्र सुरक्षीत तरच पर्यावररण संतुलन चांगले राहील. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत आहे याला पायबंद घालण्यासाठी निसर्गातील पशु, पक्षी आदींचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे निसर्ग साथी फाऊंडेशन नी हेरुन हिंगणघाट शहरासह तालुक्यातील पशू, पक्षी सुरक्षित राहण्यासाठी तालुका पक्षी व सर्प डिजीटल निवडणुकीचे आयोजन ११ ते १५ फेब्रुवारी २१ दरम्यान केले आहे.यात तालुक्यातील सर्व नागरिकांचा समावेश राहणार आहे.
राज्यात काही मोजक्या जिल्ह्यात शहर पक्षी निवडले गेले असले तरी हिंगणघाट तालुक्यात पहिल्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार असून देशासह राज्यात अन्य कुठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही.मात्र निसर्ग साथी फाऊंडेशन चे पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे.
@ अशी होणार डिजीटल निवडणूक तालुक्यातील नागरीक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध व्हाटस अप, टेलीग्राम , फेसबुक चे माध्यमातून https://forms.gle/JuBUBhkRsakH5sxmb ही लिंक दि११ फेब्रुवारी रोज गुरूवार सकाळी ७ वाजेपासून दि १५ फेब्रुवारी २१ रोज सोमवार सायंकाळी ५ वाजे पर्यंत नागरीकांना मतदान करण्यासाठी लिंक ओपन राहील. यात ठिपक्याचा पिंगळा, कोतवाल, चिमणी,शिक्रा, कावळा, गायबगळा या सहा पक्षी उमेदवाराचा तर अजगर, धामण, धोंड्या, तस्कर,कवड्या अशा पाच सर्प उमेदवाराचा समावेश आहे.
नागरिकांना पाठाविण्यात येणाऱ्या लिंक सोबत पाठविलेल्या पिडिएफ मध्ये या सर्व पक्षी, सर्प उमेदवारांची माहिती दिली आहे. याचे अवलोकन करून नागरीकांनी आपला आवडता पक्षी, सर्प निवडण्याचे आवाहन निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु, डॉ बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे, अनिल कानकाटे, राकेश झाडे, नियाझुद्दीन सिद्धीकी, परिक्षीत ढगे, प्रा अश्वीनी ढेकरे, प्रा सुलभा कडु, प्रा जितेंद्र केदार, राजश्री विरुळकर, गुणवंत ठाकरे, रुपेश लाजुरकर, आशिष भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा अभिजित डाखोरे आदींनी केले आहे.
या तालुका पक्षी ,सर्प निवडणूकीत विजयी उमेदवारांना निसर्ग साथी फाऊंडेशन चे वतीने आगामी काळात यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या तालुका पक्षी, सर्प निवडणूकीकरीता नगरपालिका , पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट वर्धा वनविभाग सहकार्य करणार असल्याचे निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची माहिती विषद करताना सांगितले.